आयमा इंडेक्स प्रदर्शनाचा समारोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |

‘स्टार्ट अप इंडिया’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 
 
नाशिक : आयमा इंडेक्स प्रदर्शनाचा आज समारोप झाला. दुसर्‍या दिवशी शनिवार आणि तिसर्‍या दिवशी रविवार असल्याने लाखो नागरिक आणि उद्योजकांनी प्रदर्शनास भेट देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विशेषतः ’स्टार्ट अप इंडिया’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयमा इंडेक्स २०१८ च्या ५ व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक ग्राहक उद्योजक यांचा प्रतिसाद मिळाला. १५० च्या वर नवीन उद्योगांची संपूर्ण महाराष्ट्रातून मोफत नोंदणी करण्यात आली.
 
विशेषतः ’आयमा’तर्फे या प्रदर्शनात सर्व नवउद्योजकांसाठी ‘स्टार्ट अप इंडीया’ची मोफत नोंदणी केली. यामध्ये बुर्‍हानपूर, ठाणे, कल्याण, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात नवउद्योजक सामील होते. या प्रदर्शनामुळे नवउद्योजकांसाठी मोठा मंच तयार झाला असून प्रतिसाद उत्तम मिळत असल्याची माहिती आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे यांनी दिली.
 
दुसर्‍या दिवशी भेट देणार्‍यांची संख्या ही साठ हजारच्या वर असण्याची शक्यता अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केली. या प्रदर्शनात नाशिक मॅरेथॉनसाठी पोलिसांनीही आपला स्टॉल लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली. मंत्राज ग्रीन रिसोर्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या स्टॉलवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत होती.
 
 
मान्यवरांच्या भेटी
 
आयमा इंडेक्स २०१८ च्या ५ व्या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला इटली येथील सिंझर बोनेटी इंटरनॅशनल कंपनीचे उमबरटो टनगोली या परदेशी उद्योजकांनी भेट देत विविध उत्पादनांची सखोल माहिती घेतली. त्यांनी काही उद्योजकांशी सविस्तर चर्चाही केली. तसेच जीएसटी व सेंट्रल एक्साईजचे कमिशनर श्रीकांत पाटील, जॉईंट कमिशनर डॉ. आर. के. राऊत व अमोल केत यांनीही विविध उद्योगांच्या स्टॉलला भेट दिली तसेच आयडीबीआय बँकेचे महाव्यवस्थापक अखिलेश मिश्रा, बँक ऑफ बडोदाचे मुख्य प्रबंधक विवेक विशाल, समर्थ बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी आदींसह मान्यवरांनी भेट दिली.
@@AUTHORINFO_V1@@