नाट्य कलावंतांनी रंगभूमीची सेवा केलीच पाहिजे : डॉ. शशिकांत बर्‍हाणपूरकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |

अमळनेरच्या 'रावीपार' एकांकीकेने पटकाविला जिभाऊ करंडक

 

 
 
नंदुरबार : राज्यात नव्हे तर राज्याच्या बाहेर देखील ज्या स्पर्धेची अल्पावधीतच ख्याती पसरली, अशा या जिभाऊ करंडकच्या यशस्वीतेसाठी मागे जिभाऊ करंडकचे रंगभूमीवर सातत्य हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक नाट्य कलावंतांनी रंगभूमीची सेवा केलीच पाहीजे आणि ही सेवा स्पर्धेच्या माध्यमातून घडत असते. भविष्यात जिभाऊ करंडकला प्रचंड यश प्राप्त होईल, यात शंका नाही, असे प्रतिपादन डॉ.शशिकांत बर्‍हाणपूरकर यांनी केले. ते जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी बोलत होते.
 
दि. २० व २१ जानेवारी २०१८ दरम्यान राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ निर्माण संस्था आयोजित जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाली. या दोन दिवसात सादर झालेल्या एकांकीका स्पर्धेचे पारितोषीक वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शशिकांत बर्‍हाणपूरकर यांच्या हस्ते रविवारी रात्री संपन्न झाले. या बक्षिस वितरण कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, रोटरी क्लबचे यशवंत स्वर्गे, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, नाट्यकर्मी रविदा जोशी, जी. टी. पी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कासार, उद्योजक आनंद जैन, संजय सोनार, साहित्यीक प्रभाकर भावसार आदी उपस्थित होते.
 
याप्रसंगी बोलतांना नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणाले की, सामाजिक भान ठेवूनच रंगभूमीवर काम केले पाहीजे. सद्याची नाट्यस्थिती ही अशा एकांकीका स्पर्धेमुळेच आधुनिकतेचे संकेत देणारी ठरत आहे. अशा स्पर्धांमुळे कलावंतांचा उत्साह वाढत असतो. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यीक प्रभाकरजी भावसार सर यांचा त्यांनी दिलेल्या नाट्य व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल मानचिन्ह देवून आयोजन समितीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी, मुंबई विद्यापीठाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगेश बनसोडे, प्रबंधक, गीत व नाट्यप्रभाग, सुचना व प्रसार मंत्रालय, चैन्नई भारत सरकारचे डॉ. जितेंद्र पानपाटील यांनी केले. यावेळी स्पर्धकांमधून नाशिक येथील आकांक्षा चंद्रात्रे व धुळे येथील पवन येवले यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत मनोगत व्यक्त केले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे प्रमुख संजय मोहिते यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार नागसेन पेंढारकर यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनसाठी मनोज सोनार, राजेश जाधव, मनोज पटेल, रविंद्र कुलकर्णी, हेमकांत मोरे, डॉ.गौतम भामरे, जयभाई गुजराथी, प्रविण खरे, परमेश्‍वर मोरे, जितेंद्र पेंढारकर, विनोद ब्राह्मणे, आशिष खैरनार, बी.एस.पवार, गोरख पवार, विजय शिरसाठ, कुंदन पाटील, गोकुळदास बेडसे, हर्षल महिरे, सागर कदम, सागर आगळे, सुभाष सावंत, प्रा. भिमसिंग वळवी, राहुल खेडकर, किरण दाभाडे, तुषार सांगोरे, तुषार ठाकरे, रवीशंकर सामुद्रे, रत्नदीप पवार, नरेश फुलपगारे, समाधान सामुद्रे, राजवर्धन नगराळे, कुणाल वसईकर, धिरज गोसावी, योगेंद्र पाटील, रोहित गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले.
 
जिभाऊ करंडक एकांकीका स्पर्धेतील विजेता संघाची यादी
 
 
प्रथम - रावीपार (कलाविष्णू बहुउद्देशीय संस्था, अमळनेर), द्वितीय - धसकट् (प्रिन्सेस थिएटर्स, औरंगाबाद), तृतीय - समोरासमोर (रंगायतन, इंदौर, म.प्र.)
सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक एकांकीका - कमांड एचटूओ (ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगांव),
सर्वोत्कृष्ठ लक्षवेधी एकांकीका - भोग (भूमी बहुद्देशीय संस्था, जळगांव),
प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र एकांकीका - विवर (अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक),
सर्वोत्कृष्ठ अभियन पुरुष - प्रथम - निलेश पाटील (रावीपार), द्वितीय - अमोल जाधव (धसकट्),
सर्वोत्कृष्ठ अभियन स्त्री - प्रथम - आकांक्षा चंद्रात्रे (विवर), द्वितीय - श्रद्धा चव्हाण (सांबरी),
सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक - प्रथम - नितीन सावळे (रावीपार), द्वितीय - नुपूर पांडे (कमांड एचटूओ),
सर्वोत्कृष्ठ नेपथ्य - विभागून-गौरव पवार (रावीपार), राज गुंगे (भोग),
सर्वोत्कृष्ठ प्रकाशयोजना - ऋषीकेश सोनवणे (भोग),
सर्वोत्कृष्ठ संगीत - दर्पण भालेराव (समोरासमोर),
सर्वोत्कृष्ठ लेखन - सचिन काजळे (धसकट)
 
@@AUTHORINFO_V1@@