सरन्यायाधीश दीपक मिश्रा आज करणार लोया प्रकरणी सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |


नवी दिल्ली : दिवंगत न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली असून सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे स्वतः या प्रकरणी आज सुनावणी करणार असल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी घेतलेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेनंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले असून या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करणार आहे. यामध्ये जस्टीस डी.वाय.चंद्रचूड आणि जस्टीस ए.एम. खानविलकर यांच्या समावेश असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी केलेल्या बंडखोरीनंतर सरन्यायाधीशांनी लोया यांचे प्रकरण अरुण मिश्रा आणि त्यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाकडून आपल्याकडे घेतलेले आहे. त्यामुळे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय सुनावणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान लोया यांच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या नागरिकांपैकी एक असलेले बंधुराज लोन यांनी याविषयी आनंद व्यक्त करत, सरन्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे काम एका स्वतंत्र संस्थेला देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी योग्य तपास करून त्यावर सुनावणी केल्यावरच त्यांना योग्य न्याय मिळेल, असे लोन यांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@