‘कॅन्सर इज बिझनेस’ न बनता ‘कॅन्सर इज ट्रीटमेंट’ व्हावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 

 

नाशिक : होमिओपॅथी, आयुर्वेद, मिस्टलेटो थेरपी, आहार, योगा, नॅचरोपॅथी या माध्यमातून प्रभावीपणे कर्करोगाच्या एकीकृत उपचारातून रुग्णास कर्करोगमुक्त करून त्यास नवजीवन प्राप्त करून द्यावे यासाठी जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी यांनी अविरत झटावे, असे आवाहन देशविदेशातील नामवंत कर्करोग उपचार तज्ज्ञांनी करताना कॅन्सर इज बिझनेस न बनता कॅन्सर इज ट्रीटमेंट व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
 
कॅन्सर केअर फाऊंडेशन, ग्लोबल होमिओपॅथिक फाऊंडेशन व मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोगाच्या एकीकृत उपचाराबाबत ज्ञानाचे सखोल आदान प्रदान व्हावे याकरिता तिसर्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेला १९ जानेवारी रोजी नाशिकमध्ये आरंभ झाला.
 
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, झंडू फार्मास्युटीकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भट, भारत सरकारचे माजी सल्लागार डॉ. ईश्वरा दास, सिसीआरएचचे महासंचालक राजकुमार मनचंदा, डॉ. फारुख मास्टर तसेच बॅनर्जी प्रोटोकॉलचे संस्थापक डॉ. प्रसंता बॅनर्जी, संशोधक डॉ. संदीप रॉय, जर्मनीच्या रचिस रोबर्ट, डॉ. फारुख मोतीवाला, डॉ. मॅन्युअल बॉईस, डॉ. राजेश शहा व डॉ. अरुण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
 
विविध कर्करुग्णांच्या उपचारासाठी विविध रुग्णालये व्हावीत : भारत सरकारचे माजी सल्लागार डॉ. ईश्वरा दास
 
कॅन्सर केअर ही एक मोठी इंडस्ट्रीच बनली आहे. कर्करोगाचे निदान झाल्यावर रुग्ण प्रचंड घाबरतो, त्याच्यावर ताण येऊन दडपण वाढते. रुग्णांना योग्य माहिती देण्यासोबत स्वस्त उपचार व्हावेत. सरकार आयुष मंत्रालयावर मोठा खर्च करीत आहे. त्याअंतर्गतच कर्करोग रुग्णालयेही उभारावीत. महाराष्ट्रात ४८ होमिओपॅथिक महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांना वेगवेगळ्या कर्करोग आजारासाठी वेगवेगळे सुसज्ज रुग्णालये उभारण्याकरिता मान्यता द्यावी, जेणेकरून मोठे संशोधन होऊन कर्करोगग्रस्तांना दिलासा मिळेल.
 
@@AUTHORINFO_V1@@