लेखकांच्या लेखणीत राष्ट्रनिर्मितीचे सामर्थ्य : नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |

वणी येथील ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचा समारोप

 
 


यवतमाळ : लेखनाच्या लेखणीमधून निघालेले शब्द हे अत्यंत असून त्यांचा समाजमनावर खूप खोल परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या लेखणीमध्ये राष्ट्रनिर्मितीचे सामर्थ्य असते' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. वाणी येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
समाज जीवनात अनेक‍ स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होतो. त्यामुळेच या व्यक्तिंचे समाजात मोठे स्थान आहे. पैसे मिळविल्याने जे सुख मिळत नाही ते सुख एखादे चांगले पुस्तक वाचल्याने हमखास मिळते. त्यामुळे मानवी जीवनात पुस्तकाचे वा साहित्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. साहित्यिक, लेखक, कवी यांच्या लेखणीतून निघणारे शब्द राष्ट्रनिर्माणासाठी उपयोगी पडतात. साहित्यिकांनी लिहिलेच पाहिजे तसेच साहित्यिकांमध्ये मनभेद होता कामा नये, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले.

याच बरोबर शिक्षण आणि साहित्य या दोन क्षेत्रांविषयी देखील त्यांनी आपले मत मांडले. शिक्षण आणि साहित्य क्षेत्र हे स्वायत्त असले पाहिजे, असे सांगत लोकशिक्षण आणि लोकसंस्कार हे विचाराशी निगडीत असतात, असे ते म्हणाले. तसेच भारत हा सुसंस्कृत देश असून. मुल्याधिष्ठित परिवारपध्दती आणि समाजसंस्कृती हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे, असे ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@