मल्हार महोत्सवात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |
 
 
 
पनवेल : मल्हार महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच रविवार दि. २१ जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
 
’रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ’, पनवेल आणि पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील ’सीकेटी विद्यालया’च्या भव्य मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ’मल्हार महोत्सव २०१८’ साठी रविवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
यावेळी ते केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी ’स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ अभियानाअंतर्गत मल्हार महोत्सवाच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भाजप पनवेल आणि सीकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ, सुंदर पनवेल अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बेस्ट इकोफ्रेंडली हाऊस, बेस्ट इकोफ्रेंडली सोसायटी आणि बेस्ट इकोफ्रेंडली हॉटेल स्पर्धेची घोषणा करणार आहेत.
 
माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोट्‌र्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, समिती प्रमुख जयंत पगडे, उपसमिती प्रमुख अनिल भगत यांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@