नांदेड-पनवेल एक्सप्रेसला कर्जतला थांबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |
 

 
 
कर्जत : नांदेड-पनवेल एक्सप्रेसला कर्जत स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सोमवार दि. २२ जानेवारीपासून ही गाडी कर्जत स्थानकावर थांबणार आहे. नांदेड-पनवेल एक्सप्रेसला कर्जत स्थानकात थांबा दिल्यामुळे बदलापूर-अंबरनाथकरांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
 
शेकडो प्रवाशांना कर्जत स्थानकातून या गाडीने प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या केवळ सहा महिन्यांसाठी हा थांबा असणार असून प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. १६ ऑक्टोबर २०१६ रोजी नांदेड पनवेल ही गाडी सुरू करण्यात आली. मात्र, या गाडीला कर्जत हा थांबा देण्यात आला नसल्याने अंबरनाथ-बदलापूरकरांना या गाडीने प्रवास करणे सोयीस्कर नव्हते. दरम्यान, या गाडीला या कर्जत स्थानकात थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेत २२ जानेवारीपासून सहा महिन्यांसाठी कर्जत स्थानकात या गाडीला थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.
 
सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी ही गाडी कर्जत स्थानकात पोहोचणार असून एक मिनिटाचा थांबा या गाडीला देण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यांसाठीच म्हणजेच २२ जुलैपर्यंत हा थांबा देण्यात आला असून प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@