पर्यावरणीय नियमांचे भान ठेवत पार पडणार ताल संग्राम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |
 

 
 
डोंबिवली : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणार्‍या ढोल-ताशाची परंपरा अभिनव पद्धतीने श्रोत्यांसमोर मांडण्याचे काम उपसंस्कृतीक नगरीत करण्याचे योजिले आहे. डोंबिवलीतील आरंभ संस्थेच्या वतीने ढोलताशांचा तालसंग्राम आयोजित केला असून येत्या २७ जानेवारी रोजी पूर्वेतील क्रीडा संकुलाच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.
 
तालसंग्राम २०१८ आरंभ प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम भरवण्यात येणार असून पर्यावरण नियमांचे उल्लंघन होणार नाही, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या स्पर्धेत कल्याण डोंबिवलीबरोबर ठाणे, नवी मुंबई, पनवेल, नाशिक आदी परिसरातील सुमारे १६ ढोलताशा पथकांनी सहभाग घेतला आहे. दि. २७ व २८ जानेवारीला दुपारी ४ ते ९.४५ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषद आमदार जगन्नाथ शिंदे, केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर, मनसे नेते राजू पाटील, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती राहुल दामले व डोंबिवलीतील वित्तीय संस्थाचेही सहकार्य लाभले आहे.
 
डोंबिवलीत असणार्‍या ढोल पथकासाठी व राज्यातील ढोलताशा कलावंतासाठी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र समूहिक ढोल वंदन करावे व या निमित्ताने डोंबिवलीचा नाद राज्यभर दुमदुमावा यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती आरंभ संस्थेचे निशांत चव्हाण, हृषिकेश पाठक, यज्ञेश पाटील, श्रीकांत घोरगे यांनी दिली. आवाजाच्या मर्यादेवर ठेवणार अंकुश मागील वर्षी गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेत ढोलपथकांच्या मर्यादेवर गणेश मंदिर संस्थेच्या वतीने व पोलिसांच्या वतीने बंधने घालण्यात आली होती. शहरातून निघणार्‍या स्वागतयात्रेत त्या वेळी मर्यादित ढोलपथके सदस्यसंख्याही ठरवून दिलेली होती. पोलिसांच्या सूचनेनुसार १ किलोमीटर अंतरावर एक ढोलताशा पथक ठेवण्यात आले होते. यामुळे तालसंग्राम कार्यक्रमात आवाजाच्या मर्यादेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, पण संस्थेच्या वतीने कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@