शहापूर, मुरबाडमधील बीएसएनएलचे टॉवर बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |

खासदार कपिल पाटील यांची दुरुस्तीची मागणी

 
 
 

 
कल्याण : भारत संचार निगमचे (बीएसएनएल) शहापूर व मुरबाड येथील टॉवर बंद पडल्यामुळे हजारो ग्रामस्थांना बीएसएनएलच्या मोबाईलचा वापर करणे अशक्य झाले आहे. दरम्यान, या टॉवरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.
 
‘बीएसएनएल’च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी दूरसंचार सल्लागार समितीची बैठक कल्याणमध्ये नुकतीच पार पडली. पालघरचे खा. चिंतामण वनगा हे समितीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत खा. पाटील यांनी बंद पडलेल्या बीएसएनएलच्या टॉवरकडे त्यांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागात दूरध्वनीचे जाळे सर्वप्रथम बीएसएनएलने विणले. त्यातून लाखो नागरिकांची गैरसोय दूर झाली.
 
बीएसएनएलने मोबाईल सेवा सुरू केल्यानंतरही हजारो ग्राहकांनी खाजगी कंपन्यांऐवजी सरकारी कंपनी बीएसएनएलला प्राधान्य दिले. मात्र, कालांतराने नेटवर्कच्या त्रास होत असल्यामुळे ग्राहकांना नाईलाजाने खाजगी कंपन्यांकडे वळावे लागले. त्यातून बीएसएनएलला मोठा आर्थिक फटका बसला. भविष्यात पुन्हा ग्राहक वाढविण्यासाठी शहापूर व मुरबाड येथील बंद पडलेल्या टॉवरप्रमाणे अन्य टॉवरचीही दुरुस्ती करावी. त्यातून आणखी ग्राहक जोडले जाऊन बीएसएनएलचा फायदा होईल, याकडे खा. पाटील यांनी लक्ष वेधले.
 
किती अधिकारी-कर्मचारी बीएसएनएलचा वापर करतात
बीएसएनएलचे नेटवर्क नसल्यामुळे अडचणी येतात. बीएसएनएलमध्ये कार्यरत किती अधिकारी-कर्मचारी केवळ बीएसएनएलचाच वापर करीत आहेत, असा सवाल खा. पाटील यांनी केला. कंपनीचे कर्मचारीच वापर करीत नसल्यामुळे कंपनीच्या सेवेत आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे, खा. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@