पंतप्रधान मोदी उद्यापासून स्वित्झर्लंड दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2018
Total Views |

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्य बैठकीत होणार सहभागी



नवी दिल्ली :
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे उद्यापासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज स्वित्झर्लंडसाठी रवाना होणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली, सुरेश प्रभू यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक महत्त्वाचे अधिकारी या बैठकीत सामील होण्यासाठी पंतप्रधान मोदींसह दावोससाठी रवाना होणार आहेत.

विशेष म्हणजे १९९७ नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान डब्ल्यूइएफच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जाणार आहेत. डब्ल्यूइएफच्या या बैठकीसाठी विविध क्षेत्रातील जगभरातून तीन हजाराहून अधिक मान्यवर उद्या दावोस येथे उपस्थित होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी हे देखील या ठिकाणी येणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी हे जगभरातील काही नेत्यांची देखील भेट घेणार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या तीन वर्षामध्ये भारतीय अर्थ व्यवस्थेनी घेतलेली विकासाचा झेप आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या नवनवीन संधी यांची नव्याने ओळख पंतप्रधान मोदी हे इतर देशांना करून देणार आहेत. आपल्या या एकदिवसीय दौऱ्यात जगभरातून आलेल्या १४०हून अधिक उद्योजकांशी देखील पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. तसेच स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपतींशी द्विपक्षीय चर्चा करून दोन्ही देशांमधील संबंधाना आणखीन दृढ करण्यावर ते भर देणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@