'अशा' गुंतवणूकदारांनी 'बॅलन्सड फंड'चा पर्याय नक्की स्वीकारावा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |
 
 


 

सातत्याने कमी होत जाणारे व्याज दर यामुळे सामान्य गुंतवणूकदार काहीसा चिंतीत झाला असून नेमकी गुंतवणूक कोठे करावी याबाबत काहीसा गोंधळून गेला आहे, अशा परिस्थितीत जर आपण पोस्ट, पीपीएफ या सारख्या पारंपारिक गुंतवणुक केली तर जेमतेम ६.५ ते ७.६ % इतका रिटर्न मिळू शकतो आणि जर शेअर मार्केट मध्ये थेट गुंतवणूक करायचे ठरविले तर नेमके कोणते शेअर घ्यायचे, कधी घ्यायचे व कधी विकायचे या बाबत फारसी माहिती नसती शियाय थेट गुंतवणुकीत जोखीमही जास्त असते यावर एक उत्तम पर्याय म्हणजे म्युचुअल फंडाच्या बॅलन्सड फंड योजनेत गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. त्या दृष्टीने बॅलन्सड फंड म्हणजे काय हे आज आपण पाहू.


 

बॅलन्सड फंड हा म्युचुअल फंडाच्या विविध योजनांमधील एक पर्याय आहे. ज्यांना शेअर मार्केटची जोखीम पूर्णपणे घ्यायची नाही पण काही प्रमाणात घ्यायची आहे, अशा गुंतवणूकदारांनी हा पर्याय अवश्य स्वीकारावा. यामध्ये आपल्या गुंतवणुकीच्या ६५% इतकी रक्कम शेअर्स मध्ये गुंतविली जाते तर उर्वरित ३५% रक्कम सरकारी कर्ज रोखे (बॉंड), खाजगी कंपन्याचे कर्ज रोखे (डिबेंचर), खाजगी कंपन्याच्या मुदत ठेवी,कमर्शियलपेपर्स, सीओडी, या सारख्या तुलनेने कमी जोखमीच्या पर्यायामध्ये गुंतविली जाते. यातील गुंतवणुकीसाठी डिव्हिडंड व ग्रोथ हे दोन पर्याय असतात, शेअर्स मधील गुंतवणूक ६५% इतकी असल्याने मिळणारा डिव्हिडंड हा करमुक्त असतो तसेच गुंतवणुकीतून होणारा भांडवली नफा (कॅपीटल गेन) हा ही करमुक्त असतो मात्र जर आपण गुंतवणुकीच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत अंशत: अथवा पूर्ण रक्कम काढली तर रिडीम केलेल्या युनिट्सवर जर भांडवली नफा असेल तर अशा नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपीटल गेन टॅक्स १५% दराने भरावा लागतो. यातील गुंतवणूक एकरकमी किंवा एसआयपी पद्धतीने करता येते. शेअर बाजारातील चढ उतारानुसार मिळणारा रिटर्न कमी आधी होऊ शकतो मात्र दीर्घ कालीन उद्दिष्टाने यात गुंतवणूक केल्यास सुमारे १२% ते १३% इतका रिटर्न मिळू शकतो व हा रिटर्न पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा ५% ते ६% जास्त असू शकतो असे असले तरी रिटर्न बाबत खात्री देता नाही. ४ प्रमुख बॅलन्सड फंडांनी गेल्या १० वर्षात कसे रिटर्न दिले आहेत हे खालील टेबल वरून पाहूया...
 
 
 फंडाचे नाव  गेल्या १ वर्षातील % रिटर्नगेल्या ३ वर्षातील % रिटर्न गेल्या ५ वर्षातील % रिटर्न  गेल्या १० वर्षातील % रिटर्न
 
आयसीआयसीआय बॅलन्सड फंड
 २५ २१ १९ १२
 
एचडीएफसी बॅलन्सड फंड
 २१ २१ १८ १४
 
बॅएसबीआय बॅलन्सड फंड
 १३ १८ १८ ११
 
 टाटा बॅलन्सड फंड 
 १५ २० १८ १४
 
 

यावरून आपल्या असे लक्षात येईल की बॅलंस फंडातील गुंतवणूक पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा निश्चितच चांगला रिटर्न देऊ शकते तरी सद्य परिस्थितीत थोडी जोखीम घेऊन बॅलंस फंडात गुंतवणूक जरूर करावी जेणे करून सध्याच्या घसरत्या व्याज दरावर मत करणे शक्य होईल.

-सुधाकर कुलकर्णी

सर्टिफायीड फायनान्सियल प्लॅनर,पुणे

 
@@AUTHORINFO_V1@@