भांडवलाशिवाय तुम्ही उद्योजक होऊ शकता : डॉ. सुरेश हावरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |

‘सोशल मीडिया प्रभावी यंत्रणा’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा

 

 
नाशिक : ’‘भांडवलाशिवाय तुम्ही उद्योजक होऊ शकता, गरज आहे फक्त इच्छाशक्तीची. आधुनिक उद्योग उभारणीत सोशल मीडिया अविभाज्य घटक असून शून्यातून सोशल मीडियाद्वारे तुम्ही व्यवसाय उभारू शकता,’’ असे प्रतिपादन डॉ. सुरेश हावरे यांनी केले.
 
’व्यवसाय वृद्धीसाठी सोशल मीडिया प्रभावी यंत्रणा’ या विषयावर १९ व २० जानेवारी रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई येथील हावरे उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी हे होते. यावेळी मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नारायण दीक्षित व्यासपिठावर उपस्थित होते. याप्रसंगी नाशिकमधील उदयोन्मुख नवलेखिका शरयू पवार हिचा सत्कार डॉ. सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आला.
 
यावेळी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी ’सोशल मीडिया’ या विषयावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण केले. नंतरच्या सत्रामध्ये गिरीश पगारे यांनी सोशल मीडिया व भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल अवगत केले. या कार्यशाळेमध्ये सीए तथा संस्थेचे खजिनदार अतुल पाटणकर नाशिक बीएसएनएलचे महेश कुलकर्णी, सायबर सुरक्षातज्ज्ञ तन्मय दीक्षित तसेच डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील अजय जोशी यांनी सोशल मीडियाच्या संबंधित क्षेत्रांतील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
 
@@AUTHORINFO_V1@@