मंत्राज रिसोर्सेस’ स्टॉलला नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |

महापौरांच्या हस्ते उद्घाटन


 
 
 
नाशिक : ‘मंत्राज रिसोर्सेस’तर्फे तयार करण्यात आलेल्या ’मंत्राज बायो कंपोस्टर’ उपकरणाचे महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा गंगापूर रोडवरील डोगरे वसतिगृहावरील सुरू असलेल्या ‘निमा इंडेक्स २०१८’या प्रदर्शनात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
या बायो कंपोस्टर उपकरणाच्या उद्घाटनाप्रसंगी महापौर रंजना भानसी, आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे एच.ए.एल.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंग, महाव्यवस्थापक शेषगिरी राव, सभागृहनेते दिनकर पाटील, शशिकांत जाधव, आयमाचे अध्यक्ष एस.एस.आनंद, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, आयमा इंडेक्सचे अध्यक्ष धनंजय बेळे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी, ’मंत्राज’च्या मोहिमेला चालना देण्यासाठी येणार्‍या पिढीला ‘स्वच्छ व हरित जग’ देण्यासाठी हा स्टॉल उपयुक्त ठरणार आहे. आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्यासह मान्यवरांनी ‘मंत्राज’चे कौतुक केले.
 
घनकचरा, जैविक कचरा, ओला कचरा, घरगुती कचरा तसेच उरलेले शिळे अन्नपदार्थ, भाज्यांचे देठ अशा कचर्‍याची घरच्या घरीच योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी ‘मंत्राज ग्रीन रिसोर्सेस’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यु.के. शर्मा यांच्या संकल्पनेतून हे बायो कंपोस्टर साकारण्यात आले आहे. २०१३ मध्ये डॉ. जैन यांनी केलेल्या अभ्यासात त्यांना घरगुती कचर्‍यासह सार्वजनिक कचर्‍याची मोठी समस्या असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सामान्य माणसाच्या सुद्धा आवाक्यात सहज उपलब्ध होईल, अशा बायो कंपोस्टरची निर्मिती केली आहे. बायो कंपोस्टर या उपकरणाची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली असून अवघ्या पंधरा दिवसांत घरच्या घरी कचर्‍याची योग्य विल्हेवाट लागून खतनिर्मिती करणे आता सोपे होणार आहे. बायो कंपोस्टर उपकरणात टाकाऊ कचर्‍यापासून तयार होणारे खत आपल्याला आपल्या परसबागेतील झाडांना वापरता येणार आहे. या प्रकल्पात तयार होणार्‍या खतासाठी एका विशिष्ट पद्धतीने हा कचरा बुजविला जातो. तसेच या कचर्‍याला कुठल्याही प्रकारचा वास येत नसल्याने हे उपकरण घरात वापरता येणार आहे.
 
रविवार दि. २१ जानेवारीपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदान नाशिक येथे सुरू असलेल्या ‘आयमा इंडेक्स’ प्रदर्शनातील ‘मंत्राज ग्रीन सोर्सेस’च्या स्टॉलला पालकांसह विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन मंत्राचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ.यु. के. शर्मा यांनी केले आहे. केवळ घरगुती वापरासाठी नाही तर मोठ्या सोसायट्यांतदेखील हे उपकरण बसविल्यास मोठ्या प्रमाणात कचर्‍याचा प्रश्न मार्गी लागण्यात मदत होणार आहे. हे उपकरण घेण्यासाठी व नावनोंदणी करण्यासाठी, डिस्ट्रीब्युटरशिपसाठी ०२५३ /२३५५०८६,२३५६६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. यु. के. शर्मा यांनी केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@