दिव्यांग क्रिकेट विश्वचषक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
दुबई: ५ व्या दिव्यांग क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आजचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. आजच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचा संघ समोरासमोर येणार असून आजच्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नुकतेच भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने घेतला आहे.
 
 
 
८ जानेवारीला भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होता हा सामना भारताने आपल्या सहज खिशात घालून या चषकातील पुढचे सामने जिंकले असून आता भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. भारताच्या दिव्यांग क्रिकेट संघाचे नेतृत्व अरविंद कुमार रेड्डी हे करत असून या सामन्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने खूप मेहनत घेतली आहे.
 
 
 
२०१४ मध्ये भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने हा विश्वचषक भारताच्या नावावर केला होता. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या जात आहे. आजचा सामना पाकिस्तान विरुद्ध असल्याने तर सगळ्यांच्याच नजर या सामन्याकडे लागल्या आहेत. 
 
@@AUTHORINFO_V1@@