‘प्रतिभासंगमात’ प्रतिभावंतांची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |
 
 
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभा संगम या विद्यार्थी साहित्यिक संमेलनात साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती अनुभवण्यास मिळत आहे. ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांच्या ९०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कथाकथन या सत्रामध्ये खुद्द त्यांच्याच उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या कथा सादर केल्या व त्यांची भरभरून दाद मिळवली. या सत्रात मिरासदार यांनी आपल्या कथालेखनाचे अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित १६ व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन सध्या पुण्यनगरीत शहराच्या मध्यवर्ती भागात बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील ४६४ विद्यार्थी साहित्यिकांनी सहभाग नोंदवला आहे. या साहित्य संमेलनात विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम कार्यक्रम घेण्यावर भर देण्यात आला. या ‘कथाकथन’ सत्रामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील एकूण प्रवास वर्णनाचा आढावा विद्यार्थ्यांना पुढे मांडला.
 

 
 
साहित्य संमेलनाच्या ‘कथाकथन’ ह्या सत्रामध्ये ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव सादर करून, विविध गोष्टींमधून या अनोख्या साहित्य संमेलनास आलेल्या विद्यार्थी साहित्यिकांना मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील एकूण प्रवास वर्णनाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना विविध गावाची नावे लक्षात ठेवण्यासाठी (स्मरणशक्ती) युक्ती सांगितली. मिरासदारांनी प्रवास वर्णनामध्ये ‘दौंड ते नगर’ ह्या त्यांच्या प्रवास कथेचे वर्णन मनोरंजनपणे करून विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याची व त्यांच्या साहित्यिक जेष्ठतेची असणारी ओळख एका वेगळ्या धाटणीतून करून दिली. यावेळी मिरासदारांनी ‘स्मरणशक्तीचे प्रबोधन’ ह्या विषयावर मार्गदर्शन केले.
 
 
तसेच यावेळी विद्यार्थी साहित्यीकांमधून काही निवडक विद्यार्थी साहित्यिकांना त्यांच्या कथा मांडण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी पायाल घुसाळकर हिने ‘घे भरारी’, विकास वाघ याने ‘माणुसकी हरवत चाललीये’ आणि ‘दंगा’, आकाश शिंदे याने ‘मी दगडू बोलतोय’, प्रज्वल पारडे याने ‘एकटा’ या निवडक विद्यार्थी साहित्यिकांना त्यांच्या कथा मांडण्यास व्यासपीठ यावेळी उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थी साहित्यिकांना भेटून त्यांनी मांडलेल्या कथांना प्रोत्साहन देऊन नवसाहित्यिक विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.
 

 
@@AUTHORINFO_V1@@