उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांचा उद्या मेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ (अनुलोम) तर्फे २१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ दरम्यान रावसाहेब सभागृह गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
 
‘अनुगामी लोकराज्य महाभियान’ ही स्वयंसेवी संस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी योजनांचा प्रचार, प्रसार व वंचित असलेल्या पात्र व्यक्तींना सरकारी योजनांच लाभ निःशुल्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. त्यासोबतच सामाजिक कार्य करणार्‍याच्या सामाजिक विकासाचा मार्ग प्रशस्त करणे हा ‘अनुलोम’च्या कामाचा एक प्रमुख भाग आहे. उत्तर महाराष्ट्र विभागात काम करणार्‍या सामाजिक संस्था, मंडळ, ग्रुप यांना सामाजिक कामाविषयी विशेष मार्गदर्शन व संस्थात्मक शासकीय नियम माहीत व्हावेत व आपापल्या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून चांगले काम करता यावे यासाठी सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
 
या मेळाव्यास पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय, बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विनय पत्राळे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्रातील ९३,१४० सभासद आहेत. त्यात ८४,८०१ पुरुष व ८,३३९ स्त्रिया आहेत. परराष्ट्र स्तरावर अनुलोमच्या रचनेतून १ लाख सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचे जाळे विणले गेले आहे. यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य अभियान, माहिती व जनसंपर्क विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग व उत्तर महाराष्ट्रातील काही विशेष प्रेरक कार्य करणार्‍या सामाजिक संस्थांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत. त्याद्वारे त्यांच्या कार्याची दखल समाजाने घ्यावी, तसेच उत्तर महाराष्ट्र स्तरावर ‘अनुलोम’च्या माध्यमातून झालेले कार्य व त्या कामातून झालेले सामाजिक परिवर्तन आदींची प्रदर्शनी लागणार आहे. त्यासाठी लोकांनी या प्रदर्शनास भेट देऊन सामाजिक कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप मारावी, असे आवाहन अनुलोमचे उत्तर महाराष्ट्र विभाग जनसेवक अमित डमाळे या कार्यक्रमाचे स्वागत समितीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, स्वागत समिती सचिव सागर वैद्य, व्यवस्थाप्रमुख उमेश पगार व प्रसिद्धीप्रमुख तौफिक शेख यांनी केले आहे.
 
मेळाव्याचे वैशिष्ट्य
 
या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे की, यामध्ये सामाजिक समूहांनी नेमक्या कोणत्या विषयात काम करावे, संस्था रजिस्टर कशी करावी, १२ एए व ८० जी नोंदणीबाबत माहिती, सरकारी नियमांची माहिती व कागदपत्रांची पूर्तता, ऑडिट रिपोर्ट कसा बनवावा, इन्कमटॅक्स फाईल कसे करावे, निधी कसा उभारावा, संस्थेच्या वार्षिक अहवालाचे महत्त्व या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. सामाजिक संस्थांच्या कार्याविषयी सहायक धर्मादाय आयुक्त प्रदीप घुगे विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@