नाशिकमध्ये कर्करोगाच्या उपचाराबाबत आंतरराष्ट्रीय परिषद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2018
Total Views |
 

 
 

नाशिक : कर्करोगाच्या एकीकृत उपचाराबाबत ज्ञानाचे सखोल आदानप्रदान करण्यासाठी नाशिकमध्ये १९ ते २१ जानेवारीदरम्यान आंतरराष्ट्रीय परिषद होत असून कॅन्सर केअर फाऊंडेशन, ग्लोबल होमिओपॅथिक फाऊंडेशन व मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या या परिषदेत अनेक नामांकित तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
 
दि. १९ जानेवारी रोजी सिटी सेंटर येथील बॉल रूममध्ये याचे उद्घाटन होणार असून यावेळी झंडू फार्मास्युटिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भट, भारत सरकारचे माजी सल्लागार डॉ. ईश्वरा दास, सीसीआरएचचे महासंचालक राजकुमार मनचंदा, होमिओपॅथी कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, डॉ. फारुख मास्टर तसेच बॅनर्जी प्रोटोकॉलचे संस्थापक डॉ. प्रसंता बॅनर्जी, मिस्टलेटो थेरपीचे संशोधक डॉ. संदीप रॉय यांची प्रमुख उपस्थिती राहिल. यावेळी जागतिक पातळीवरील तज्ज्ञ डॉ. सॅबेस्टियन स्क्लोट, डॉ. जॉन विल्केन्स, ऑस्ट्रेलियाचे डॉ. मॅनुला बोयेल हे प्रमुख असून याशिवाय बेल्जियम, श्रीलंका व बांगलादेशमधील तज्ज्ञही यात सहभागी होतील. तीन दिवस चालणार्‍या या परिषदेस कर्करोगाच्या रुग्णांनाही उपस्थित राहता येणार असून त्यामुळे त्यांनाही अन्य उपचारपद्धतीबाबत माहिती मिळणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@