विजय गोखले भारताचे नवे परराष्ट्र सचिव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नवी दिल्ली : भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची जागा आता परराष्ट्र मंत्रालयातील अर्थविषयक सचिव म्हणून काम पाहणारे विजय गोखले यांनी घेतली आहे त्यामुळे आता भारताचे नवे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे असणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयात विजय गोखले हे सध्या वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहतात.
 
 
१९८१ बॅचचे आयएफएस अधिकारी विजय गोखले हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंधाचे सचिव आहेत. आता ते एस. जयशंकर यांची जागा घेणार आहेत. २८ जानेवारीला एस. जयशंकर यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने विजय गोखले यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे.
 
 
विजय गोखले हे २० जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये चीनमध्ये भारताचे राजदूत देखील होते. चीन, जर्मनी आणि मलेशिया या देशांमध्ये त्यांनी भारताचे राजदूत असल्याचे काम पार पाडले आहे. गोखले यांचा कार्यकाल आता पुढील दोन वर्ष असणार आहे. विशेषतः नुकताच झालेल्या डोकलाम वादावेळी गोखले यांनी चीनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@