भीमा-कोरेगावच्या घटनेचे पवारांनी फोडले हिंदुत्ववाद्यांवर खापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |





पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव युद्धाच्या द्विशतकपूर्तीनिमित्त निघालेल्या जमावावर काल झालेल्या हल्ल्याचे खापर पुण्यातील हिंदुत्वादी संघटनांवर फोडले आहे. १ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तीन चार दिवस अगोदर पुण्यातील काही हिंदुत्ववादी संघटना भीमा कोरेगाव जवळील गावांमध्ये गेल्या व तेथे जाऊन त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे हा हल्ला झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तरी राज्यातील सर्व नागरिक आणि नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन कसल्याही प्रकारचा जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून १ जानेवारीनिमित्त राज्याच्या कानाकोऱ्यातून नागरिक भीमाकोरेगावला येतात व आपली श्रध्दा व भावना व्यक्त करतात. परंतु अशा प्रकारची घटना या अगोदर कधीही घडली नव्हती. परंतु भीमाकोरेगाव युद्धाच्या द्विशतकपुर्तीनिमित्त मात्र नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे जाणून काही प्रवृत्तींनी याचा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. व त्यामुळे हि घटना घडली,' असे त्यांनी म्हटले. तसेच या संबंधी कसलीही ठोस माहिती आपल्याकडे नसून वढू गावातील ग्रामस्थांनी हे सर्व सांगितले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले व या हिंदुत्ववादी संघटनांचे नाव आपण घेणार नाही, असे ते म्हणाले.





या हल्ल्यामध्ये नांदेडच्या एका युवकाचा मृत्यू झाला असून हे कृत्य लोकशाहीसाठी अत्यंत अशोभनीय आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच या युवकाच्या हत्येचे कसलेही राजकारण न करता, राज्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी सामंजस्याने व संयमाने कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता योग्य प्रकारे ही परिस्थिती हाताळावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 
@@AUTHORINFO_V1@@