भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
पुणे : भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला २०० वर्षेपूर्ण झाल्या निमित्ताने आंबेडकरी संघटनांतर्फे मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. त्या कार्यक्रमात हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
 
 
मानवंदनेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर काही अज्ञात समाजकंटकांनी जमलेल्या नागरिकांवर दगडफेक केली. त्यामुळे जमावातील नागरिक सैरावैरा पळू लागले. यात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाचा दुर्दैवाने मृत्यू देखील झाल्याची महिती समोर आली आहे.
 
 
केंद्रीय समाजकल्याण मंत्री खा. रामदास आठवले यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले की. या घटनेची चौकशी व्हावी, व दोषींवर त्वरित कारवाई केली जावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. असे प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
या घटनेला काही समाजकंटकांद्वारे जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हिंसाचाराचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@