भारत-चीन सीमेवरील सर्व चौक्यांना रस्त्यांनी जोडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती





नेलाँग :
भारत आणि चीन यांच्या सीमेवर असलेल्या सर्व भारतीय चौक्या आणि सैनिकी तळांना जोडणासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत असून यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. उत्तराखंडमधील इंडो-तिबेट पोलीस दलाच्या जवानांचा भेटी दरम्यान त्यांच्याशी ते बोलत होते.


भारत-चीन सीमेवरील जवानांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी सध्या केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी याभागात उत्तम रस्ते बांधून त्याद्वारे सैन्येला लागणाऱ्या सर्व साहित्यांची वाहतूक सुलभरित्या व्हावी आणि सर्व चौक्या रस्त्यांच्या द्वारे जोडल्या जावेत, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच या कामासाठी सरकार निधी देखील मंजूर केला असून या रस्त्यांच्या उभारणी करण्याचे काम देखील सरकारकडून सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी जवानांना सांगितले.





इंडो-तिबेट सीमेवरील भारतीय जवानांच्या तुकड्यांना सिंह यांनी काल भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी जवानांशी संवाद साधत सरकारच्या कामगिरी बद्दल त्यांना माहिती दिली. तसेच इंडो-तिबेट पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सैनिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अनेक विषयांवर चर्चा केली. व नव्य मुद्द्यांना देखील त्यांनी यावेळी मान्यता दिली.
@@AUTHORINFO_V1@@