उत्तरप्रदेश गुंतवणूकदार संमेलनाविषयी बैठक आयोजित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

 
उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 'गुंतवणूकदार' संमेलनाच्या तयारी संबंधी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
 
 
 
 
जे लोक उत्तरप्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचे स्वागत, सुरक्षा आणि सुविधा याविषयी आमचे सरकार सदैव तत्पर असेल, अशा भावना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वी या संमेलनाविषयी आदित्यनाथ यांनी मुंबई येथे काही उद्योजकांची भेट देखील घेतली होती.
 
 
 
 
उत्तरप्रदेश येथे रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच उत्तरप्रदेशची युवा पिढी रोजगारासाठी हतबल होवून इतर कुठे जावू नये यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत, उत्तरप्रदेशाच्या विकासासाठी गुंतवणूकदारांचे सल्ले अत्यंत महत्वपूर्ण ठरतील, असेही ते यावेळी म्हणाले. राज्याला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी सकारात्मक दृष्टी ठेवून कार्य करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@