जनतेला चांगले आरोग्य देण्याचे स्वप्न पुर्ण करु या - पालकमंत्री आत्राम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

गडचिरोली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य २०१८ पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केलेला आहे. त्याच धर्तीवर संपुर्ण गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे आवाहन आज राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी केले. तसेच जिल्हा हागणदारी मुक्त करुन जनतेला चांगले आरोग्य देण्याचे स्वप्न पुर्ण करु असा संकल्प आज कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी करण्यात आला.
 
 
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्हा हागणदारी मुक्त करण्याकरीता पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा सांस्कृतिक भवनात आयोजित केली होती. या प्रसंगी ते बोलत होते. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना महत्वाचे स्थान आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या समोर आदराने डोक्यावर पदर घेतात. ही आपली संस्कृती आहे. जगामध्ये भारतीय संस्कृती ही आदर्श म्हणून मानल्या जाते. महिलांना ऐवढे महत्व असताना आपली माता, भगिनी लोटा घेऊन शौचास बाहेर जाते.
 
ही बाब आपल्या संस्कृतीस शोभणारी नाही. आपल्या आया बहीणीची लज्जा राखणे तसेच उघडयावर शौचास जाण्यामुळे होणारी कुचंबणा थांबवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी महत्वाचा भाग म्हणजे घरातील महिला, वडीलधारी मंडळी व लहान मुले यांच्यासाठी शौचालय असणे व त्याचा नियमित वापर करणे गरजेचे आहे. याकरीता आपल्याला घराघरात शौचालय बांधकाम करणे आवश्यक झाले आहे. जेणे करुन सर्वांना याचा वापर करता येईल असे ते यावेळी म्हणाले. 
@@AUTHORINFO_V1@@