नव्या वर्षातील पहिल्या विदेश दौऱ्यासाठी सुषमा स्वराज सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

 
नवी दिल्ली :  नव्या वर्षातील पहिल्या ५ दिवसीय विदेश दौऱ्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सज्ज झाल्या आहेत. या ५ दिवसीय दौऱ्यामध्ये त्या ३ देशांना भेट देणार आहेत. ४ ते ८ जानेवारी या काळात त्या थायलँड, इंडोनेशिया आणि सिंगापूर या देशांना भेट देणार आहेत.
 
भारताच्या 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी' या धोरणांतर्गत या देशांच्या भेटी ठरवण्यात आल्या आहेत. ४ आणि ५ जानेवारी रोजी स्वराज थायलँड येथे भेट देणार आहेत, तसेच यावेळी त्या थायलँडचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉन प्रामुद्विनाई यांच्याशी चर्चा करणार आहेत. या द्वीपक्षीय चर्चेत सुषमा स्वराज राजकीय संरक्षण आणि आर्थिक विषयांवर चर्चा करतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
 
५ आणि ६ जानेवारी रोजी सुषमा स्वराज इंडोशियाला भेट देणार आहेत, येथे त्या "इंडिया इंडोनेशिया जॉइंट कमिशन" या बैठकीत सहभागी होणार असून इंडोनेशिया संयुक्त आयोगाचे सहसंस्थापक रेंटो मार्सुदी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. इंडोनेशिया सरकारतर्फे स्वराज यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या दोन दिवसीय भेटी दरम्यान सुषमा स्वराज आणि मार्सुदी "एशियन इंडिया नेटवर्क ऑफ थिंक टॅंक" या बैठकीचे उद्याघटन देखील करतील.
 
७ आणि ८ जानेवारी रोजी सुषमा स्वराज सिंगापूर या देशाला भेट देणार आहेत. यावेळी त्या 'प्रवासी भारतीय दिवस' या कार्यक्रमाचे सिंगापूर येथे उद्घाटन करतील. आशिया खंडातील देशांशी असलेल्या संबंधांना बघता स्वराज यांचा हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@