नूतन माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

शेतीपूरक प्रकल्पाची बालवैज्ञानिकांनी केली मांडणी


 
शहापूर : रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत तालुक्यातील चांग्याचा पाडा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनातील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करून ग्रामस्थांना शेतीपूरक मार्गदर्शन केले.
 
विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन शेतीविषयक पूरक बहुउद्देशीय प्रकल्प मांडले होते. त्यामध्ये सेंद्रिय खत, बोटॅनिकल गार्डन, परसबाग, सेंद्रिय शेती, बायोगॅस प्रकल्प यांसह विविध वैज्ञानिक विषयावरील प्रकल्पाद्वारे उपस्थितांसमोर माहिती सादर केली तर रांगोळ्यांच्या माध्यमातून ज्ञानरचनावादाची मांडणी करत अभ्यासपूरक उपक्रम प्रदर्शित केले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी विठ्ठल विशे, लखू हरणे, भास्कर विशे, प्राथमिक शाळेचे डामासेसर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनाप्रसंगी बालकलाकारांनी विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून आपल्या सुप्त कलेला प्रकट केले. यामध्ये तन्मय बांगर या विद्यार्थ्याने काढलेली पाण्यावरची रांगोळी विशेष आकर्षक ठरली.
 
विज्ञान विभागप्रमुख घरत सर, सापळे सर, शिंदे सर, गोखले सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रदर्शनास माझगाव डॉकचे गीते सर, सोनुने सर व परिसरातील महिला व ग्रामस्थांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
@@AUTHORINFO_V1@@