त्या ४ काँग्रेस आमदारांची मोदींच्या हाकेला साद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

 
 
मेघालय : मेघालयातील ४ काँग्रेस आमदार, इतर पदाधिकारी आणि शेकडो समर्थाकांसोबत भाजपमध्ये सामील होणार आहेत. 'मेघालय फॉर चेंज - मेघालय फॉर बीजेपी' या पंतप्रधानांच्या हाकेला त्यांनी साद दिली आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केले.
 
 
 मेघालयातील आमदार भाजप प्रणीत नॅशनल पिपल्स पार्टीच्या आघाडीत सामील झाल्याचे श्रेय आपल्या ट्वीटमध्ये माधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मेघालयातील मुकुल संगमा यांच्या काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांच्या सहित ४ आमदारांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी काँग्रेसला रामराम ठोकला होता.
 
 
सध्या तेथील काँग्रेस अपक्ष उमेदवारांच्या पाठींब्यावर सत्तेत आहे. मात्र आता ४ आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. त्याचबरोबर आणखी ५ आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यात काँग्रेसपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@