शून्य प्रहरात तब्बल १५ वर्षांने पूर्ण काम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |


 
नवी दिल्ली : राज्यसभेत काल ऐतिहासिक घटना घडली. दरवेळी राज्यसभा गदारोळामुळे तहकूब अशी बातमी आपण अनेकदा वाचली असणार मात्र काल तब्बल १५ वर्षांनंतर राज्यसभेत विक्रम घडला आहे. शून्यप्रहरात पहिल्यांदात पूर्ण १५ प्रश्नांचा समावेश करण्यात आला. तसेच एकूण १८ मंत्र्यांनी आपले विचार मांडले. गेल्या १५ वर्षात कालचा दिवस राज्यसभेत सर्वात यशस्वी दिवस होता. या प्रहरात गेल्या १५ वर्षात आज सर्वाधिक काम झाले.
 
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकैय्या नायडू यांनी गेल्या १५ वर्षात कालच्या दिवशी सगळ्यात अधिक काम झाले असल्याची नोंद केली. "राज्यसभेत आज इतिहास घडला. पहिल्यांदाच सर्व प्रश्नांचा समावेश करुन यादीत असलेल्या सर्व मुद्यांवर आज चर्चा झाली." असे म्हणून त्यांनी मंत्र्यांचे कौतुक केले.
 
गेल्यावेळी राज्यसभेच्या १९७व्या सत्रात वर्ष २००२ मध्ये हा विक्रम घडला होता. त्यानंतर तब्बल काल म्हणजेच २०१८ मध्ये असे पुन्हा घडले, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत अनेकदा विरोधकांच्या गदारोळामुळे कामात अडथळा येतो, तसेच अनेक वेळेला राज्यसभेचे कामकाज तहकूब देखील करावे लागते, मात्र काल सारखे काम जर नेहमी झाले तर नक्कीच सर्व महत्वाचे प्रश्न लवकर सुटतील असे देखील नायडू म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@