आत्मविश्वासातून संघर्षाची प्रेरणा : ऍड. उज्ज्वल निकम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : "आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास आयुष्यात संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. त्यासाठी मन:स्थिती बदलणे आवश्यक आहे. ती बदलल्यास परिस्थिती आपोआप बदलते," असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ‘खान्देश रत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले. सिडको, लवाटेनगर येथे सुरू असलेल्या खान्देश महोत्सवाची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी कर्मभूमी आणि जन्मभूमीने खान्देशी असलेल्या नागरिकांचा ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने ऍड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश गायधनी, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील आदी उपस्थित होते. आपल्या देशात विविध जातीधर्माचे लोक राहतात आणि देशाच्या प्रबळ लोकशाहीत देशात एकोपा टिकून राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 
 
११ जणांना पुरस्कार प्रदान
 
 
दरम्यान, यावेळी ऍड. निकम यांच्या हस्ते आर्किटेक्ट संजय पाटील, कलाकार कांचन पगार, राजेश कोठावदे, स्वाती पाचपांडे, सुरेश पवार, नंदलाल जगताप, डॉ. रावसाहेब पाटील, प्रमोद कोतवाल, रवींद्र पाटील, गीता माळी, डॉ. विजया पाटील यांना ‘खान्देश रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@