सुनिधी चौहान हिच्याकडून नवीन वर्षाची गोड बातमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई: प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाची गोड बातमी दिली आहे. सुनिधी चौहानच्या घरी एका छान गोंडस मुलाचे आगमन झाले आहे. १ जानेवारी २०१८ ला सुनिधी चौहानला ‘बेबी बॉय’ झाला आहे. मुंबईतील सूर्या रुग्णालयात तिने काल तिच्या मुलाला जन्म दिला.
 
 
गर्भवती असतांना सुनिधी आपल्या व्यस्त कामकाजापासून जरा दूरच राहिली त्यामुळे बऱ्याच तिच्या चाहत्यांना ती गर्भवती आहे याची माहिती नव्हती. संगीतकार आणि दिग्दर्शक हितेश सोनिक आणि सुनिधी चौहान २०१२ मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यानंतर काही कालावधीनंतर या दोघांनी आपल्या करिअरवर लक्ष दिले नंतर आता त्यांनी आपले कुटुंब मोठे करण्याचा निर्णय घेतला.
 
आज नव वर्षात सुनिधीला पुत्ररत्न प्राप्त झाला. सुनिधी आजच्या काळातील प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली जाते. तिने अनेक सुपरहिट गाणे गायले आहेत. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@