हरियाणात माथेफिरूने केल्या दोन तासांत सहा हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |




पालवाल (हरियाणा) : हरियाणामधील पालवाल जिल्ह्यामध्ये एका माथेफिरूने दोन तासात सहा नागरिकांच्या हत्या केल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान या माथेफिरूला अटक करण्यात आली असून काल मध्यरात्री लोखंडी गजाच्या सहाय्याने या माथेफिरूने सहा नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरामध्ये सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांनी घाबरू नये असे सांगितले आहे.
 
पालवालमधील सिटी थाना येथे आज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी सहा हत्या झाल्याचे नागरिकांच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आले. मृतांमध्ये एक महिला, तीन सुरक्षारक्षक आणि दोन पुरुषांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व हत्या एकाच प्रकारे केल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
 
 
यानंतर सिटी थाना परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरांची पाहणी करण्यात आल्यानंतर त्यामध्ये मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती हातामध्ये लोखंडी गज घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या माथेफिरूचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. यानंतर तपासामध्ये या माथेफिरूचे नाव नरेश असल्याचे समोर आले आहे. तसेच तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
@@AUTHORINFO_V1@@