इंदौर येथे उद्यापासून सुरु होणार 'फ्रेंड्स ऑफ एमपी कॉन्क्लेव्ह'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

 
इंदौर : इंदौर येथे उद्यापासून 'फ्रेंड्स ऑफ एमपी कॉन्क्लेव्ह' सुरु होणार आहे. यामध्ये जगभरातून मध्यप्रदेशातील मूळनिवासी येणार आहेत, तसेच मध्यप्रदेशाच्या विकासासाठी ते काय हातभार लावू शकतील याविषयी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.
 
 
 
 
मध्यप्रदेश सरकारतर्फे मध्यप्रदेशाच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत,त्यापैकी एक या योजनेत मूळचे मध्यप्रदेशचे असलेले, मात्र शिक्षण किंवा कामानिमित्त दुसऱ्या देशात स्थायिक झालेल्या नागिकांना बोलविण्यात येणार आहे. मध्यप्रदेशाच्या विकासासाठी ते काय मदत करु शकतील याविषयी ते आपले विचार या कॉन्क्लेव्ह मध्ये मांडणार आहेत, असेही चौहान यांनी सांगितले.
 
हा कार्यक्रम ३ आणि ४ जानेवारी रोजी मध्यप्रदेशाची आर्थिक राजधानी इंदौर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मध्यप्रदेश सरकारतर्फे करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@