अंबरनाथमध्ये महिलांसाठी होणार व्यायामशाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

पाच रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

 
 
 
 
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात येत्या आठवड्यात सुमारे पाच कोटी रुपये खर्चाच्या पाच नव्या सीसी रस्त्याचे भूमिपूजन, महिलांसाठी व्यायामशाळा उद्घाटन करण्याबरोबरच चौक सुशोभीकरण करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवार दि. ६ जानेवारीला रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
 
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका रेश्मा काळे यांच्या प्रभागात महिलांसाठी बांधलेल्या व्यायामशाळेचे उद्या ३ जानेवारी रोजी उद्घाटन केले जाणार आहे. हुतात्मा चौक आणि स्वामी समर्थ चौक सुशोभिकरण या कामांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे.
 
सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून ती जलदगतीने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शनिवार ६ जानेवारी रोजी शहरातील प्रमुख पाच रस्त्यांच्या भूमिपूजनाबरोबरच काही रस्त्यांचे रुंदीकरण करणे,केले जाणार असल्याचे नगरसेवक निखिल वाळेकर यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@