आजपासून डॉक्टर देशव्यापी संपावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक डॉक्टरांना अमान्य
आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सुरू राहणार
 
 

ठाणे : केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा देशभरातील डॉक्टरांना मान्य नसल्याने डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने २ जानेवारीला देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस डॉक्टर ’काळा दिवस’ म्हणून पाळणार आहेत. त्यामुळेच, डॉक्टरांची संघटना आयएमएने २ जानेवारीला १२ तासांचा संप पुकारलाय.
 
सकाळी ६ वाजल्यापासून संघ्याकाळी ६ वाजेपर्यंत डॉक्टर कामकरणार नाहीत. संप काळात केवळ आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सुरू ठेवणार असल्याची माहिती संपकरी डॉक्टरांनी दिली. इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील सर्व सदस्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.
 
संघटनेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. मंगेश पाटे याबाबत माहिती देताना म्हणाले, ’’आम्ही वर्षभरापासून सरकारसोबत नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाबाबत चर्चा करतोय. मात्र सरकारकडून अद्याप काही ठोस निष्कर्ष समोर आले नाही. नवीन विधेयकामुळे भ्रष्टाचार वाढून खाजगी वैद्यकीय कॉलेजवर कोणाचाही धाक राहणार नाही. याच्या निषेधार्थ आम्ही २ जानेवारीला काळा दिवस पाळणार आहोत. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक, डॉक्टरांच्या विरोधात असल्याने डॉक्टर सरकारवर नाराज आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनीदेखील अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना डॉक्टरांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@