टेंभा गांव प्रकल्पग्रस्त घोषित करण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 

 
 
शहापूर : शहापूर तालुक्यातील कित्येक गावपाड्यातील जमिनी स्थानिक शेतकर्‍यांनी भातसा, तानसा, वैतरणा व मध्य वैतरणा या धरणांसाठी दिल्या मात्र तेथील धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यातच वैतरणा व मोडकसागर धरणग्रस्त असलेल्या टेंभा गावातील ग्रामस्थांवर अन्याय झाला असून या गावाला प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करावे, अशी मागणी आमदार पांडुरंग बरोरा व संगीत शारदा, सामाजिक विकास संस्थेच्या संगीता कोर यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली आहे.
 
बृहन्मुंबई महापालिकेने बांधलेल्या वैतरणा हे धरण तालुक्यातील टेंभा ग्रामपंचायती अंतर्गत असून या गावातील स्थानिक भूमिपुत्रांनी व शेतकर्‍यांची शेकडो एकर जमीन महापालिकेने संपादित केली आहे. तत्कालीन राज्यपाल यांच्या आदेशानुसार जे. सी. डिसोझा लॉरेन्स उपसचिव, महाराष्ट्र शासन यांनी टेंभा गावातील जमीन संपादित करण्यास सुरुवात केली. या धरणामुळे टेंभागाव परिसरात लघुउद्योगांनाही सक्त मनाई करण्यात आली आहे परिणामी बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे.
 
मुंबई व उपनगरांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी व वैतरणा मोडकसागर ते तानसा धरण यांना जोडणार्‍या रस्त्यांची जमीन गेली. त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मिळतात आणि महापालिका नोकरीही देते पण संपूर्ण वैतरणा धरण ज्या गावांत किंवा हद्दीत आहे तेथील ग्रामस्थांवर, शेतकर्‍यांवर आदिवासी बांधवांना मुलभूत सुविधाही मिळू नयेत, ही मोठी शोकांतिका आहे.
 
याबाबत ग्रामस्थांनी ८ ते १० वर्षे महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे महापालिकेने तात्काळ टेंभा गांव प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करावे तसेच त्यांना नोकरभरतीत सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनाकद्वारे करण्यात आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@