धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
दिल्ली: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कडाक्याने संपूर्ण दिल्ली गारठून गेली असतांना दिल्लीवरून सुटणाऱ्या काही महत्वाच्या गाड्या आज पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. वाढत्या धुक्यामुळे अपघात टाळता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. राजधानीमधील ६४ रेल्वे गाड्या सध्या उशिराने धावत आहेत.
 
तर २० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या आतापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. वाढत्या धुक्याच्या प्रभावामुळे रेल्वे गाडीच्या चालकाला पुढचे अंधुक दिसत असल्याने तसेच थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. विमानसेवा देखील काही प्रमाणात बंद करण्यात आली आहे. २०० विमान उड्डाणे सध्या थंडीपासून प्रभावित आहेत.
 
अश्याच प्रकारची स्थिती असल्यास काही महत्वाची देशांतर्गत उड्डाणे रद्द केली जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित सुरु राहतील. तसेच रेल्वे गाड्या देखील रद्द होण्याची शक्यता आहे. अशी माहिती सध्या मिळत आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@