जखमींची भेट घेण्यासाठी 'ते' जम्मू-काश्मीरला रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |


नवी दिल्ली : सकाळी सांबा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तान सैनिकांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय नागरिकांची भेट घेण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले आहेत. याच बरोबर या गोळीबार प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेणार आहेत.
 
दरम्यान पाकिस्तानने केलेल्या या हल्लाचा सिंह यांनी अत्यंत तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. आज दुपारनंतर सिंह हे श्रीनगर येथे पोहचतील यानंतर मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि इतर अधिकाऱ्यांच्या सोबत ते जखमी नागरिकांना भेट देण्यासाठी रुग्णालयाकडे जातील. तसेच या हल्ल्यासंबंधी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री मुफ्ती यांच्यासह सिंह हे चर्चा देखील करणार असल्याचे बोलले जात आहे.
 
सांबा जिल्ह्यातील आरएसपुरा, अर्निया आणि हिरानगर येथील भारतीय चौक्यांवर आज सकाळी पाकिस्तान सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे लष्कराबरोबरच भारतीय नागरिकांना देखील पाकिस्तान सैनिकांनी या गोळीबारात लक्ष केले होते. या गोळीबारामध्ये एकूण ५ नागरिक जखमी झाले असून ३ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.
@@AUTHORINFO_V1@@