पाकिस्तान सैनिकांकडून भारतीय नागरिकांवर गोळीबार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

तीन नागरिक ठार, गावांमधील सर्व शाळा बंद

 
 


सांबा :
जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आरएसपुरा आणि अर्निया येथील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तान सैनिकांनी आज पुन्हा एखादा शस्त्रसंधीचे उल्लंघन केला आहे. परंतु यावेळी पाकिस्तान सैनिकांनी भारतीय चौक्यांबरोबरच भारतीय नागरिकांना देखील लक्ष केले असून या गोळीबारामध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच नागरिक जखमी झाल्याचे देखील वृत्तसमोर आले असून त्यांच्याविषयी आणखीन माहिती समोर आलेले नाही.

आज पहाटे आरएसपुरा आणि अर्निया जवळील नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांना लक्ष करत, पाकिस्तान सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर थोड्यावेळात भारतीय नागरिकांना देखील लक्ष करत पाक सैनिकांनी भारतीय नागरिकांना देखील लक्ष करण्यास सुरुवात केली. गावातील नागरिकांवर गोळीबार आणि मॉरर् शेलिंग करत करत पाक सैनिकांनी भारतीत सैनिकांवर देखील गोळीबार सुरु ठेवला. भारतीय जवान पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख उत्तर देत असतानाच पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे तीन भारतीय नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच या गदारोळामध्ये अन्य काही नागरिक देखील जखमी झालेचे वृत्त आहे. याच बरोबर या गोळीबारामुळे आरएसपुरा आणि अर्नियाच्या जवळच्या तीन किलोमीटरपर्यंतच्या भागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत व नागरिकांनी देखील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशी सूचना देखिल देण्यात आली आहे. 

आरएसपुरा आणि अर्निया येथे दोन दिवसांमध्ये पाकिस्तानकडून दुसऱ्या भारतीय नागरिकांवर आणि गोळीबार करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने पाकिस्तान सैनिक आणि घुसखोरांविरोधात केलेल्या कठोर कारवाईनंतर पाकिस्तान सैनिकांनी बुधवारी आणि त्यानंतर आज आरएसपुरा आणि अर्निया येते गोळीबार करण्यास सुरुवात केली. गेल्या बुधवारी झालेल्या गोळीबारामध्ये भारताच्या एका जवानाला आपला प्राण गमवावा लागला होता, तर या गोळीबार चार नागरिक देखील जखमी झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@