मनपा गाळेधारकांना विलंब शुल्क नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

 
नाशिक : महापालिकेच्या गाळेधारकांना केलेल्या भाडेवाढीबाबत गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बुधवार दि.१७ जानेवारी रोजी आ. सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेत आपली कैफीयत मांडली. यावेळी, रणजित पाटील यांनी गाळेधारकांच्या भावना समजून घेत नाशिक महापालिकेने गाळ्यांच्या मासिक भाडेवाढीबाबत विलंब शुल्क न आकारता दि. ४ जानेवारी २०१७ पासून शुल्क आकारणी करण्याचे आदेश दिले.
 
नाशिक महानगरपालिकेचे विविध गाळे भाडेकराराने देण्यात आलेले आहेत. सदर गाळ्यांच्या मासिक दरामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्यात आली होती. दरवाढ करताना गाळेधारकांच्या उत्पन्नाचा कुठलाही विचार करण्यात आला नाही आणि सदर दरवाढ ही क्षेत्रनिहाय अतिशय विसंगत असल्याची तक्रार गाळेधारकांनी केली होती. याशिवाय दि. ३१ मार्च २०११ च्या करारनाम्याप्रमाणे गाळेधारकांच्या कराराची मुदत संपल्यानंतर नवीन करारनामा करताना यामध्ये १० टक्के, २० टक्के व ३० टक्के दरवाढ करण्यात येत होती. ही दरवाढ अन्यायकारक असल्याची भावना गाळेधारकांच्या संघटनेने व्यक्त होती. यावर तोडगा काढण्यासाठी आ. सीमा हिरे यांनी थेट नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देऊन बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१७ जानेवारी) मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत सविस्तर चर्चा होऊन डॉ. रणजित पाटील यांनी भाडेवाढ ही पूर्वलक्ष्यी प्रभावाने न करता ज्या दिवशी भाडेवाढीबाबतचा आदेश काढला त्या दिवसापासून सुरू करावी, याबाबत शासनाचे धोरण काय आहे याची पडताळणी करून मनपाने निर्णय घ्यावा, असे आदेशित केले. यावेळी नगरविकास विभागाचे उपसचिव जाधव, कक्ष अधिकारी सुनील धोंडे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, उपअभियंता आर.जी. खैरनार, सहायक अधीक्षक एस.आर. आहेर, कनिष्ठ लिपीक एस.डी. गोहील, गाळे भाडेवाढ समितीचे नरेंद्र वाळुंजे, दीपक लोढा, शब्बीर मर्चंट, सुलेमान सय्यद, श्रीपाद शेलार, तुषार पाटील, सुशील नाईक आदी उपस्थित होते.
एकच दरवाढ चुकीची :

रोडफ्रंटचे गाळे आणि मागील गाळ्यांची दरवाढ ही एकच आकारणे चुकीचे आहे तसेच पहिल्या मजल्यावरील भाडे हेदेखील कमी असावे. गाळेधारकांना मुलभूत सोयी सुविधा मनपाने उपलब्ध करून द्याव्यात. याबाबत मनपाने स्थानिक पातळीवर महापौर व गठित केलेल्या समितीने तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आदेशही पाटील यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिले.
@@AUTHORINFO_V1@@