कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी करण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

 
नाशिक :  गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी करून कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याकामी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणनमंत्री सुभाष देशमुख यांची समक्ष भेट घेऊन केली असल्याची माहिती लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली.
 
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये राबविण्यात येणार्‍या संगणकीकृत लिलाव पद्धतीची अंमलबजावणी व संगणकीकृत लिलाव पद्धती प्रणालीमध्ये अंतर्भूत कॅश क्रेडिट लिमिट व ऑनलाईन डिजिटल पेमेंट या सुविधेच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील निवडक बाजार समित्यांचे सभापती व सचिवांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
तसेच केंद्र शासनाने कांद्यासाठी लागू केलेले ८५० अमेरिकी डॉलर प्रती टन किमान निर्यात मूल्य व लेटर ऑफ क्रेडिटसाठी सादर करावयाच्या कागदपत्रांची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने व्यापारी वर्गास कांद्याची निर्यात करणे अडचणीचे होत असल्याची माहिती दिली.
 
त्यावर मुख्यमंत्री फडणवीस व पणनमंत्री देशमुख यांनी शेतकरी हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन याप्रश्नी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे शिष्टमंडळास सांगितले. शिष्टमंडळात सभापती होळकर यांच्यासह, उपसभापती संदीप (ललित) दरेकर, सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, प्रकाश कुमावत यांचा समावेश होता.
@@AUTHORINFO_V1@@