भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत श्रॉफ हायस्कुलचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

रोहन त्रिवेदी राज्यात पहिला

 
नंदुरबार - राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत येथील श्रॉफ हायस्कुलचा विद्यार्थी चि.रोहन त्रिवेदी हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या रुपाने जिल्ह्याचा बहुमान वाढला असून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
 
भूगोल विषयक जाणीवा जागृती व्हावी म्हणून राज्यस्तरावर भूगोल प्रज्ञा शोध मंडळ कार्यक्रम राबवित असते. त्या अंतर्गत प्रज्ञा शोध परीक्षा घेतली जाते. डिसेंबर २०१७ मध्ये राज्यभर एकाचवेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत चि.रोहन त्रिवेदी हा इयत्ता ७ वीच्या विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमाने झळकला. त्याला प्रमाणपत्र, सुवर्णपदक व रोख बक्षीस देण्यात आले. इयत्ता ९ वी शाखेतून चि.पार्थ देसले हा शाळेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. उपक्रमशील शिक्षिका म्हणून सौ.पल्लवी चव्हाण यांना पुरस्कार, प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह यांना भूगोल विषयक उपक्रमशील शाळा असल्याचा गौरव म्हणून पुरस्कार, प्रमाणपत्र देण्यात आले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व भूगोल शिक्षकांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह, उपमुख्याध्यापक नानाभाऊ माळी, पर्यवेक्षक राजेंद्र कोळी, सौ.विद्या सिसोदिया आदींनी अभिनंदन केले.
@@AUTHORINFO_V1@@