केरळमध्ये महाविद्यालयीन संघ कार्यकर्त्याची भरदिवसा निर्घृण हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |
 
 
 
कन्नूर (केरळ) : केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून आज केरळमध्ये आणखी एका संघ कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली आहे. श्याम प्रसाद (वय - २४) असे हत्या करण्यात आलेल्या संघ कार्यकर्त्याचे नाव होते.
 
 
 
श्याम प्रसाद आयटीआय अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. आज संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या महाविद्यालयातून श्याम प्रसाद आपल्या घराकडे येत असताना तोंडावर कापड गुंडाळलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. श्याम प्रसादने निसटून जाण्याचा प्रयत्न केला. तो जवळच्या घरात आसऱ्यासाठी जात असतानाच व्हरांड्यातच त्याच्यावर वारंवार धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर श्याम प्रसादला इस्पितळात नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला.
 
 
 
श्याम प्रसाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कण्णवम् येथील विद्यार्थी शाखेचा मुख्य शिक्षक होता. तसेच तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा देखील कार्यकर्ता होता. श्याम प्रसाद सध्या कक्कयंगड आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
 
 
 
गेले काही महिने केरळमध्ये सातत्याने संघ व भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. विशेषकरून विद्यमान राज्यसरकार सत्तेत आल्यापासून या हत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही हत्या देखील यापूर्वीच्या हत्यांप्रमाणेच कडव्या डाव्या विचारांच्या सरकारने पुरस्कृत केलेल्या गुंडांकरवी करण्यात आली असल्याचा आरोप केरळ भाजपने केला आहे. कम्युनिस्ट व जिहादी गटाने एकत्रितपणे ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@