आयमा इंडेक्स-२०१८’ प्रदर्शनाचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

 
 
नाशिक :  नाशिकच्या लघु, मध्यम उद्योजकांना व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने आयमाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयमा इंडेक्स-२०१८’ चा शानदार शुभारंभ आज करण्यात आला. सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आलेला कार्यक्रम गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर पार पडला. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रंजना भानसी, आ. बाळासाहेब सानप, सीमा हिरे, आयमा अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आला.
 
या प्रदर्शनाच्या माध्यमातून पहिल्यांदा शंभर टक्के बुकिंग पूर्ण झाली आहे. त्यात १२ डोमच्या माध्यमातून ३२८ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच उद्योजकांना खुल्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात एचएएलने आपल्या उत्पादनांची मांडणी करण्यासाठी स्वतंत्र डोम उभारला आहे. 

यासह मंत्राज ग्रीन रिसोर्स, मर्सिडीज बेंझ, कॉसमॉस, लेझर कटिंग यंत्रणा अशा विविध मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून या प्रदर्शनाला आकर्षक करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून एस.एस. एंटरप्रायजेसच्या शत-प्रतिशत आयातीला रोखणारे ‘इ-टॉयलेट’चे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच मंत्राज ग्रीन रिसोर्सच्या ‘बार्या डायजेस्टर’ या पर्यावरणातील दूषितपणा रोखणार्‍या यंत्रणेचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@