मुंबई येथे पुन्हा एकदा अग्नि तांडव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

 
मुंबई : मुंबईच्या लोअर परळ भागात आग लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील नवरंग स्टुडिओमध्ये गुरुवारी रात्री उशिरा आग लागली. अग्निशामक दलाला त्वरित कळवण्यात आले.
 
आगीचे स्वरूप भीषण असल्याने १२ गाड्यांना बोलवावे लागले. अग्निशामक दलाने युद्धपातळीवर ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेवटी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे.
 
आग विझवण्याचे कार्य करत असताना अग्निशामक दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. २० वर्षांपासून बंद असलेल्या या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली असल्याची माहिती अग्निशामक दलातर्फे देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@