नंदुरबार येथे आजपासून जिभाऊ करंडक राज्यस्तरीय स्पर्धेला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

दोन दिवसात सादर होणार १८ एकांकीका

 
नंदुरबार - येथे निर्माण संस्था आयोजित जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेला येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे सुरुवात होत आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून १८ नाट्यसंस्थांचा सहभाग राहणार आहे.
 
 
दि.२० व २१ जानेवारी २०१८ दरम्यान होत असलेल्या सदर स्पर्धा राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ गेल्या सहा वर्षापासून संपन्न होत आहेत. या स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील रसिक श्रोत्यांना दरवर्षी एकांकीकेची मेजवानी मिळत असते. राज्यभरातून विविध नाट्यसंस्था या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी इंदौरसह (मध्यप्रदेश) मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमळनेर, जळगांव, धुळे या शहरातील नाट्यसंस्थांतर्फे एकुण १८ एकांकीका सादर होणार आहेत.
 
 
या स्पर्धेचे उद्घाटन दि.२० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर हे असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शंकरराव पाटील, रोटरी क्लबचे यशवंत स्वर्गे, माजी प्राचार्य ऍड.पी.एन.देशपांडे, नगरसेवक अमित रघुवंशी, रविंद्र पवार, निलेश तवर, डॉ.विशाल चौधरी, पंकज पाठक, मिलिंद पहुरकर, नरेश नानकाणी हे असतील. तर दि.२१ जानेवारी २०१८ रोजी रात्री ८ वाजता हिरा बिझनेस गृपचे चेअरमन डॉ.रविंद्र चौधरी यांच्याहस्ते बक्षिस वितरण संपन्न होणार आहे. सत्कारमूर्तींचा सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ (औरंगाबाद) नाट्यशास्त्र विभागप्रमुख शशिकांत बर्‍हाणपूर हे करतील. प्रमुख अतिथी म्हणून व्यंकटराव पाटील, डॉ.राजकुमार पाटील, रविदा जोशी, चंद्रशेखर चव्हाण, मनोज श्रॉफ, संजय सोनार, ऍड.प्रकाश भोई हे असतील. यावर्षी विशेष सत्कारमूर्ती म्हणून ज्येष्ठ साहित्यीक व नाट्यकर्मी प्रभाकर भावसार यांचा सन्मान आयोजन समितीतर्फे करण्यात येणार आहे.
 
 
दोन दिवसात सादर होणार्‍या एकांकीकांचे परीक्षण करण्यासाठी सुप्रसिद्ध नाटककार प्रेमानंदजी गज्वी, मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.मंगेश बनसोडे, प्रबंधक, गीत व नाट्य प्रभाग, सूचना व प्रसारण मंत्रालय, चैन्नई, भारत सरकारचे जितेंद्र पानपाटील हे करणार आहेत. या जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून शहरवासियांना एकांकीकेची मेजवानी या दोन दिवसात मिळणार आहे. म्हणून जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मनोज पटेल, रविंद्र कुलकर्णी, नागसेन पेंढारकर, संजय मोहिते, मनोज सोनार, राजेश जाधव, हेमकांत मोरे, डॉ.गौतम भामरे, जयभाई गुजराथी, प्रविण खरे, राजेंद्र माहेश्‍वरी, परमेश्‍वर मोरे, जितेंद्र पेंढारकर, विनोद ब्राह्मणे, आशिष खैरनार, बी.एस.पवार, गोरख पवार, विजय शिरसाठ, कुंदन पाटील, गोकुळदास बेडसे, हर्षल महिरे, सागर कदम, सागर आगळे, सुभाष सावंत, प्रा.भिमसिंग वळवी, राहुल खेडकर, किरण दाभाडे, तुषार सांगोरे, तुषार ठाकरे, रवीशंकर सामुद्रे, रत्नदीप पवार, कैलास पानपाटील, वैभव थोरात, मेघराज पेंढारकर आदींनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@