एनएसजी सदस्य राष्ट्रांशी भारताची चर्चा सुरु : रवीश कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : अणूऊर्जा पुरवठादार गट अर्थात ‘एनएसजी’च्या सदस्य राष्ट्रांसोबत भारताची चर्चा निरंतर सुरु आहे अशी माहिती आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. एनएसजी सदस्य देशांसोबत भारताची चर्चा सुरु आहे, तसेच पाकिस्तानकडून जे शस्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे त्याला देखील भारतीय सुरक्षा रक्षक चोख उत्तर देत आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
 
सध्या भारतामध्ये खोट्या नोटा पसरविल्या जात आहे. या खोट्या नोटा कोणाकडून पसरविल्या जात आहेत याचा तपास भारतीय सरकार घेत आहे. खोट्या नोटा चलनात आल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचे नुकसान भोगावे लागत आहे. मात्र यावर लवकरच उपाय केले जातील असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २२ जानेवारीला स्वित्झर्लंडमधील दावोस शहराच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ते या दौऱ्यावर जाणार आहेत. २३ ते २६ जानेवारीदरम्यान ही बैठक होणार असून या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी भाषण देणार आहेत. हा दौरा भारतासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. यामुळे जागतिक मंचावर भारताला आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@