उत्तम मार्केटींग व्यवस्था देईल, बचत गटांना बळकटी - हंसराज अहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
चांदा क्लबवर ४२ लाखाचा विक्री व्यवसाय
 

चंद्रपूर: शेती, शेतकरी, शेतमालाची विक्री, शेतीचे तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, शेतीतील जलव्यवस्थापन अशा विविध आघाडयांवर मार्गदर्शन आणि या व्यवसायाशी नाळ जुळलेल्या बचत गटांच्या प्रदर्शनी व विक्रीचा गेल्या पाच दिवसाच्या सोहळयाचा शानदार समारोप चांदा क्लब मैदानावर झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी बचत गटांच्या स्टॉलला भेट देवून व्यक्तिगतरित्या चौकशी केली. तर समारोपाच्या सत्रात उत्तम मार्केटींग व्यवस्थेसाठी बचत गटांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सव, सेंद्रीय शेतमाल विक्री, महिला बचत गट मेळावा व मार्गदर्शन सत्रांचा एकत्रित आयोजन १५ जानेवारीपासून चांदा क्लब ग्रांऊडवर सुरु होते. चंद्रपूर शहर व जिल्हयातील नागरिकांनी या मेळाव्याला उत्तम प्रतिसाद दिला. वेगवेगळया विभागांच्या कृषी संबंधीत उपक्रमांना जोडून जल, जमीन, जंगलशी संबंधीत योजना, उपक्रम एकत्रित मांडण्यासाठी एकत्रित आयोजन करण्यात आले होते. त्याला योग्य प्रतिसाद जिल्हाभरातून मिळाला असून या वर्षी विक्रमी ४१.४६ लक्ष रुपयांची विक्री झाली आहे. यामध्ये बचत गटांच्या विक्रीचा आकडा २२ लाखावर असून शेतीमधील उत्पादनाचा विक्री आकडा १९.४६ लाख आहे.
 
 
समारोपाच्या सत्राला मार्गदर्शन करण्यापूर्वी विक्रमी विक्री करणा-या बचत गटांच्या कौतुकासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वेळ दिला. त्यांनी बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तू मागील कौशल्य जाणून घेतले. अनेकांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवला. त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यामुळे प्रदर्शनीतील प्रत्येक स्टॉलवरील बचत गटांच्या सदस्यांना आनंद झाला. यावेळी त्यांनी सेंद्रीय शेतीत तयार झालेला तांदुळ व त्याची प्रतवारी जाणून घेतली. तर लाकडांपासून विविध कलाकृती साकारणा-या कलाकाराच्या संसदेच्या प्रतिकृतीजवळ बराच वेळ घालवला. समारोपाच्या कार्यक्रमात या कलाकारांचे आवर्जून कौतुक करतांना त्यांनी उपस्थित अधिका-यांनी आता योग्य मार्केटिंगसाठी बचत गटांना मदत करावी, असे आवाहन केले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@