प्रजासत्ताक दिन संचलनात आयएनएस विक्रांत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |
 
 

 
 
 
दिल्ली: येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये काही नवीन बदल नागरिकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीची युद्ध नौका आयएनएस विक्रांतचा भारतीय नौदलाच्या संचलनामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना यावेळी पहिल्यांदाच आयएनएस विक्रांत युद्ध नौकेची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे.
 
 
२०२० मध्ये आयएनएस विक्रांत ही भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात दरवर्षी एकच रथ चालविला जातो मात्र यावर्षी आयएनएस विक्रांतची प्रतिकृती देखील समाविष्ट करण्यात येणार आहे. या युद्धनौकेची निर्मिती कोची येते होत असून २०२० मध्ये या नौकेला भारतीय नौदलात घेण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@