जम्मू-काश्मीरमधील पोलीस स्थानकावर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस स्थानकावर आज दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पुलवामा येथील तहसील कार्यालयात देखील ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची बातमी सध्या मिळत आहे.
 
 
या चारही जखमी पोलिसांना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार दिले जात आहे. सध्या पुलवामा येथील आजूबाजूच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षा रक्षक शोध मोहीम राबवीत आहेत. 
 
 
दरम्यान आज सकाळपासून पाकिस्तानच्या सैन्यांकडून सीमेपलीकडून देखील भारतीय सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला होता. 
@@AUTHORINFO_V1@@