मोबाईल गेमिंग आणि शैक्षणिक ऍपच्या दुनियेतला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2018
Total Views |

संगणक क्रांतीनंतर झालेली आणि सर्वांना प्रभावित करणारी मोठी क्रांती म्हणजे मोबाईल. मोबाईलशिवाय हल्ली कोणतेही कामहोऊ शकत नाही. आपण मोबाईल इतक्या सहजतेने वापरू लागलो आहोत की, सुमारे दहा वर्षांपूर्वी अशी काही सुविधा नव्हती, याचा विकारदेखील आपल्या मनात येत नाही. त्याबरोबरच मोबाईलचे अनेक दुष्परिणामदेखील चर्चेत येत असतात. लहान मुले मोबाईलवर खेळत बसतात आणि आपल्या हातातून मोबाईल देण्याची त्यांची तयारी नसते. मोबाईलच्या वेडामुळे आजार जडतात, अशा बातम्याही अधूनमधून येत असतात. काहीही असले तरी मोबाईलला पर्याय नाही एवढे मात्र खरे! एकदा मोबाईलला पर्याय नाही ही बाब स्वीकारली की त्याचा आणखी चांगला वापर कसा करता येईल असा विचार सुरू होतो. नवीन तंत्रज्ञान हे वरदान ठरू शकेल, अशा पद्धतीने नवीन पिढी विचार करीत असून शैक्षणिक बाबीसाठी मोबाईल ऍपचा वापर करण्यासाठी नाशिकचे तरुण उद्योजक मानस दिलीप गाजरे यांनी अनेक उपक्रमराबविले आहेत.
मानस गाजरे यांनी मुंबईतील भवन्स कॅम्पसमधून संगणक विषयात बी. ई. केले. त्यानंतर याच विषयात आवडही निर्माण असल्याने नाशिकच्या के. टी. एच. एम. कॉलेजातून गणित विषयातून एम. एस्सी. केले. त्यानंतर राज्यशास्त्र हा विषय घेऊन विषयासाठी एम. ए. च्या वर्गात प्रवेश घेतला. मात्र, एक वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना उद्योगातील व्यस्ततेमुळे पुढे जाता आले नाही. शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या उद्योगाला सुरुवात केली. तीन वर्षे त्यांनी ‘डेक्स्टर’ म्हणून सॉफ्टवेअर कंपनी चालविली. त्यानंतर आता त्यांनी झाबुसा लॅब सुरू केली आहे. मोबाईल गेमया कंपनीमार्फत तयार केले जातात. विशेष म्हणजे, या कंपनीने आतापर्यंत दीड हजार ऍप बनविले असून ५० गेम्स तयार केले आहेत. त्यातील बलून बॉ ऍरो म्हणजे धनुष्यबाणाने फुगे फोडणे या गेमला प्रचंड प्रतिसाद लाभला. सुमारे पन्नास लाख युजर या गेमला मिळाले आहेत.
खेळ खेळण्यासाठी म्हणजे टाईमपास म्हणून मोबाईलचा वापर इतकाच मर्यादित विचार मानस गाजरे यांनी केलेला नाही. त्याबरोबरच शिक्षणासाठी ऍप बनविणे हा त्यांचा उपक्रमअसून बालवाडीतील मराठी शिक्षणासाठी त्यांनी बनविलेल्या ऍपमध्ये शब्दोच्चार तर शिकता येतातच. हे ऍपदेखील सुमारे दीड लाख जणांनी डाऊनलोड केले आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी शिक्षणाची एबीसीडीदेखील मुलांना दुसर्‍या एका ऍपद्वारे शिकता येते. सेंट फ्रान्सिस हायस्कूलमधील शिक्षिकेने त्यातील शब्दोच्चार केले आहेत. त्यात स्पेलिंग करेक्शनची देखील सुविधा आहे.त्यालादेखील चांगला प्रतिसाद आहे. याबाबतचे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले असून त्यातील चित्रावर ऍप धरल्यावर चित्र रंगीत जिवंत स्वरूपात पाहायला मिळते. अन्य आकृत्यादेखील त्रिमित आकारात पाहायला मिळू शकतात. त्यांचे रंग बदलणे, नवे रंग देणे असे कहीही करता येते. शब्दकोडे हेदेखील चांगले ऍप असून ते लोकप्रिय आहे. शब्दकोडी छापल्याने वृत्तपत्रे लोकप्रिय झाली. इतर काही करण्यापेक्षा हा छंद चांगला. त्यामुळे त्याचे ऍपदेखील चांगलेच आहे. गाजरे यांच्याकडे १५०० वर शब्दकोडी असून २० लाख लोकांनी वेळोवेळी ती सोडविण्याचा आनंद लुटला आहे. पुस्तक वाचन, लेखन याचे ऍप मनोरंजक असून त्याबरोबर विविध चित्रे आणि प्रतिमा यांचे दर्शन मोबाईलवर घडते. चित्रांची थ्रीडी दृश्य प्रतिमा जिवंत वाटते. त्यातून मुलांना खेळता खेळता शिकता येते. रॉकेट, मासा चित्रात कसा दिसतो आणि त्यावर क्लिक केले की मासा पोहू लागतो, रॉकेट अंतराळात झेप घेते. असा खरोखरच कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगमत्यात दिसून येतो.
गाजरे यांच्या कंपनीत १० जणांचा कर्मचारी वर्ग असून त्यात संगणक शिक्षित आणि चित्रकार, अभिनेते असे विविध तज्ज्ञ आहेत. त्यांनी एक चष्मा विकसित केला असून भावी काळातील तंत्रज्ञांची झलक त्यातून पाहायला मिळते. हा चष्मा डोळ्यावर चढविला की समोर तुम्ही ज्याच्याशी बोलता तो दिसतो. दुसर्‍या बाजूला त्रिमिती दृश्ये दिसू शकतात. एकाच वेळी ही क्रिया होत असल्याने समोरच्याला मात्र त्याची यत्किंचितदेखील कल्पना नसते. अशा तर्‍हेने नवे काम उभे राहत असून भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टार्ट अप’साठी हा प्रकल्प जाणार असून त्या योगे सरकारी योजनेचे लाभ नव्या कल्पक उद्योगांना मिळू शकतील.


-पद्माकर देशपांडे
 
@@AUTHORINFO_V1@@