केंद्रात आणि राज्यात जनतेचे सरकार : मदन येरावार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2018
Total Views |



यवतमाळ : केंद्रात आणि राज्यात जनतेला अभिप्रेत असलेले आणि सामान्य जनतेचे सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे हे सरकार लोकांप्रती उत्तरदायी आहे. सरकार सामान्य जनतेचा विचार करून निर्णय घेत असून सरकारचे निर्णय आणि योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहचावा' असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले. पुसद येथील उपविभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते

शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. पुसद तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा असल्याने येथे उद्दिष्टही मोठे आहे, असे सांगून येरावार म्हणाले, पुसदचा परिणाम जिल्ह्यावर होत असतो. त्यासाठी अधिका-यांनी शासकीय नोकरीत नवनवीन कल्पना राबवाव्या व कामासाठी स्वत: पुढाकार घ्यावा. शासनाने कितीही लोकोपयोगी निर्णय घेतले आणि ते जनतेपर्यंत पोहचले नाही, तर सरकारची प्रतिमा खराब होते. त्यामुळे अधिका-यांनी गांभिर्याने कामे करावीत. व सरकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. 

यावेळी पालकमंत्र्यांनी आदिवासी विभाग, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, अंगणवाडी इमारत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना, पुसद शहर पाणी पुरवठा योजना, दिग्रस-दारव्हा-कारंजा महामार्ग भुसंपादन, पाणीटंचाई परिस्थिती, रखडलेल्या आणि अपूर्ण पाणी पुरवठा योजना आदींचा आढावा घेतला.
@@AUTHORINFO_V1@@